filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; motionR: null; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 32768;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 38;
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशाला केराची टोपली.
पंढरपूर:- आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील अनाधिकृत डिजिटल बोर्ड पंढरपूर नगरपालिकेने काढण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या पथकाने डिजिटल बोर्ड काढण्याचा फार्स केला. डिजिटल बोर्ड काढून चार दिवस होत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा शहरांमध्ये अनाधिकृत डिजिटल बोर्ड रस्त्याच्या कडेला झळकू लागले आहेत. यावेळी चक्क नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नवनियुक्त पदाधिकारी नितीन काळे यांनी शहरात प्रमुख रस्त्यांवर हे डिजिटल बोर्ड लावले आहेत. पंढरपूर नगरपालिकेने चक्क पालकमंत्र्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे.
शहरात असलेल मोठे मोठे डिजिटल होर्डिंग्ज देखील बेकायदेशीर आहेत. भाई राऊळ पुतळा ते प्रांत कार्यालय रस्त्यावर 100 फुटाचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. यात्रा काळात रस्त्यावरून रेल्वेने आलेले भाविक चालत मंदिराकडे येत असतात. त्यामुळे होर्डिंग्ज पडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन सर्व डिजिटल काढण्याची मागणी आता वारकऱ्यांमधून होत आहे.
