नितीन धोत्रे कडे भक्त निवासाच्या स्वच्छतेचे टेंडर होते….
भक्तनिवास मधील कॅन्टीनच्या ठेक्यांमध्ये देखील नितीन धोत्रेचा सहभाग असल्याची चर्चा…..
विठुरायाच्या शॉर्टकट दर्शन एजंट नंतर समितीच्या ठेक्यांमध्ये देखील एजंटचा वावर….
आता थेट मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर मंडप व्यवसायिकाचा पैसे घेतल्याचा आरोप….
पंढरपूर :- आषाढी यात्रा कालावधीमध्ये BVG कंपनीच्या सुरक्षारक्षकाने वारकऱ्याला केलेल्या मारहाणी वरून आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने व्हीआयपी दर्शन बंद असताना देखील समितीतील आत्या मामाच्या जोडीने दर्शनाला माणसं सोडल्याचा प्रकार समितीसमोर उघड झाला असून देखील कारवाई होत नाही. यावरून मंदिर समिती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यामध्येच आता समितीचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांनी दर्शन मंडप दर्शन रांगेचे टेंडर मिळवून देतो म्हणून मध्यस्थी एजंट नितीन धोत्रे यांच्यामार्फत चार लाख 70 हजार रुपये घेतल्याचा आरोप सोलापुरातील मंडप व्यावसायिका ने केल्याने एकच खळबळ माजली आहे.
पुरुषोत्तम नागनाथ सग्गम (वय ५०, रा. ३६९, सोनिया नगर, विडी घरकुल, हैद्राबाद रोड, पंढरपूर) यांचा मंडप कॉन्टक्टरचा व्यवसाय आहे. पंढरपूर मध्ये नितीन जगन्नाथ धोत्रे नावाचा मित्र असून त्याने मला पंढरपूर येथे वारीचे मंडप कॉन्ट्रक्टचे टेंडर निघणार असून तुमचा कोणी मित्र असेल तर सांगा. मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री हे माझे चांगल्या ओळखीचे असून त्यांनीच मला टेंडर घेण्यासाठी माणूस बघ म्हणून सांगितले आहे. तुला टेंडर भरायचे असेल तर सांग असे विशाल अंबादास सरवदे (रा. सोलापूर) या मित्राने पुरुषोत्तम सग्गम यांना सांगितले. यांनरत सरवदे याने नितीन धोत्रे याला माझा मित्र मंडप कॉन्ट्रक्टचे काम घेण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानुसार १८ फेब्रुवारी २०२५ रोजी भेटण्यास बोलविले. ठरलेल्या दिवशी मंदिर समितीच्या भक्तनिवासातील मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोती यांच्या ऑफीसमध्ये गेलो, त्यावेळी तुम्ही टेंडर भरा तुम्हाला पत्राशेड, दर्शनबारी व मंडपाचे काम मिळवून देतो परंतु मला टेंडर रक्कमेच्या ७ टक्के रक्कम कमिशन स्वरुपात रोखीने ॲडव्हान्स स्वरुपात द्यावी लागेल असे सांगितले.
तसेच पत्राशेड, दर्शनबारी ठिकाणचे फोटो व जिओ टेगींग घेण्यास सांगितले. त्यानुसार फोटो टॅगिंग केले. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मंडपाचे कामाचे टेंडर भरले, त्यानंतर धोत्रे यास फोन करुन सांगितले. त्याने ठरल्याप्रमाणे ॲडव्हान्स रक्कम श्रोत्री साहेबांना देण्यसाठी घेऊन या असे सांगितले. २५ फेब्रुवारी दिड लाख रुपयांची रोख रक्कम घेत्तून श्रोत्रींच्या ऑफीस मध्ये गेले होते. तेव्हा श्रोत्री यांनी पैसे आणले असतील तर धोत्रे यांच्याकडे देण्यासाठी सांगितले. त्यानंतर धोत्रे याने श्रोत्रींना ॲडव्हान्स रक्कम मिळाली असल्याचे सांगितल्यावर श्रोत्रींनी सग्गम यांना बिनधास्त जाण्यास सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी धोत्रे सोलापूर येथे आला त्याने श्रोत्री सांहेबांनी २० हजार रुपये घेतले.
त्यानंतर काही कारणाने टेंडर रद्द झाल्यावर श्रोत्रींनी पु्हा नविन टेंडर भरण्यास सांगितले. २४ मार्च रोजी पुन्हा नव्याने टेंडर भरले. त्यानंतर दोन तीन दिवसांनी पुन्हा त्यांच्या मागणीनुसार ३ लाख रुपये घेऊन भक्तनिवास येथे आले. त्यावेळी धोत्रे यांनी श्रोतींना फोन करुन पुरुषोत्तम सग्गम हे पैसे घेवून आलेच्या सांगितले, त्यावेळी ३ लाख रुपये दिले. त्यानंतर बिनधास्त जा, क्षोत्री आपले काम करतील म्हणून सांगितले. परंतु काही दिवसांनी टेंडर दुसऱ्याला गेल्याचे कळाले, त्यामुळे सग्गम यांनी दिलेले पैसे माघारी मागितले. वेळोवेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री व नितीन धोत्रे यांना घोन करुन तुम्ही आमचे काम केले नाही आमचे पैसे तर परत द्या असे विनंती केली. परंतु त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. त्यामुळे रोख रक्कम ४ लाख ७० हजार रुपये व ७५ हजार रुपये टेंडर भरण्याचे चार्जेस असू एकूण ५ लाख ४५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा अर्ज घेऊन सग्गम यांनी पोलीस ठाण्यात गेले होते.
::::: समितीच्या व्यवस्थापकांशी चर्चा केलेले संभाषण व्हायरल :::::
पुरुषोत्तम सग्गम यांनी टेंडर मिळावे यासाठी दिलेली ४ लाख ७० हजार रुपये माघारी मिळावे यासाठी वारंवार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री व नितीन धोत्रे यांना फोन केले होते. त्या फोन दरम्यान झालेले संभाषणच्या क्लीप व्हायरल झाल्या आहेत.
संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराची प्रतिक्रिया वाचा
समितीचे कार्यकारी अधिकारी काय म्हणताता वाचा:::::
मंदिर समितीच्या टेंडर मिळवून देतो म्हणून पैसे घेतल्याबाबतचा तक्रारी अर्ज माझ्यापर्यंत आला नाही. तसा अर्ज आल्यास, किंवा पोलीस प्रशासनाने चौकशी केल्यास त्यांना आपण निपक्षपाती सहकार्य करु, त्याचबरोबर या प्रकरणात कोणीही सहभागी असल्यास कार्यवाही करु.
– राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
पुरुषोत्तम नागनाथ सग्गम काय म्हणाले वाचा
माझे मंदिर समितीच्या व्यवस्थापकांच्या कार्यालयातच मनोज श्रोत्री यांच्याशी बोलणे झाले यामुळे नितीन धोत्रे यांच्याकडे रुपये दिले. मला टेंडर दतो म्हणून माझ्याकडून पैसे घेतले होते. परंतु मला पैसेपण माघारी मिळत नव्हते, यामुळे मी त्यांच्याविरुध्द पंढरपूर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे.
– पुरुषोत्तम नागनाथ सग्गम, व्यवसायिक, मंडप
मनोज श्रोत्री यांची प्रतिक्रिया वाचा
यात्रा कालावधीतील मंडपाच्या टेंडर संदर्भातील संभाषणाच्या ऑडीओ क्लीप माझ्यापर्यंत आल्या नाहीत, त्यामुळे याच्यावर मला काही बोलायचे नाही.
– मनोज श्रोत्री, व्यवस्थापक, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
