पंढरपूर :- पंढरपूरच्या कुंभार गल्लीत आज मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आई आणि मुलाची राहत्या घरात निर्घुण हत्या करण्यात आली आहे. कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन संजय जगताप ( वय – 25) आणि त्याची आई सुरेखा संजय जगताप ( वय 55 ) यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत. तर सुरेखा जगताप त्यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले. लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली ? कुठला कारणावरून झाली ? याबाबत कुठलीच ठोस अशी माहिती पुढे आली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. लखन हा कुरियर कंपनीत काम करत होता तर वडिलांचा भाजीपाल्याचा व्यवसाय असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या डबल मर्डरने पंढरपुरात एकच खळबळ माजली आहे. पुढील तपास सुरू केला आहे.
सदरचे वृत्त मिळालेल्या प्राथमिक माहितीवर आधारित आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सविस्तर वृत्त देण्यात येईल.
