पंढरपूर ब्रेकिंग….
आमदार उत्तम शिवदास जानकर यांना उच्च न्यायालयचा दणका !!!!
पंढरपूर :- माळशिरसचे युवा नेते संकल्प हनुमंतराव डोळस यांनी आमदार उत्तम जानकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि ए. एस गडकरी यांच्या खंडपीठाकडून आमदार उत्तम जानकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सुनावणी देखील 30 जुलै रोजी होणार असल्याने आमदार उत्तम जानकर यांची आमदारकी राहणार की जाणार हे पंधरा दिवसात स्पष्ट होणार आहे.
संकल्प डोळस यांचे वडील स्वर्गीय आमदार हनुमंत डोळस यांनी 15 वर्षापासून आमदार उत्तम जानकर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.
त्यांच्या निधनानंतर संकल्प डोळस यांनी आमदार उत्तम जानकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
या पुनर्विचार याचिके अंतर्गत आमदार उत्तम जानकर यांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यवंशी आणि गडकरी यांच्या खंडपीठाकडून आमदार उत्तम जानकर यांना नोटीस बजावण्यात आली नोटीस आहे. आमदार उत्तम जानकर यांना हा मोठा धक्का मानला जातोय. पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे.
पहा संकल्प डोळस काय म्हणतात…..
