पंढरपूर :- पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये शनिवारी सकाळी तीन महिला भाविक बुडाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर एका महिलेचा शोध सुरू आहे. सुनिता सपकाळ आणि संगीता सपकाळ असे मृत महिला वारकऱ्यांची नावं आहेत. तर एका महिलेचा शोध सुरू आहे. आज सकाळी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी या महिला भक्त पुंडलिकाजवळ आल्या होत्या. उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने या महिला नदीत बुडाल्या.
यावेळी प्रशासनाचे जीव रक्षक उपस्थित नव्हते. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन देखील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा या ठिकाणी हजर नसल्याचा आरोप यावेळी मृत महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे.
