
पंढरपूर :- पंढरपूर शहरातील गणेश नगर भागात असलेल्या पाण्याच्या टाकीचे रायझिंग मेन लाईन गळती बंद करण्याचे काम पंढरपूर नगरपालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे 4 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट असे दोन दिवस गणेश नगर भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 6 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक पंढरपूर नगरपालिकेने काढले आहे. त्यामुळे गणेश नगर येथील पाण्याच्या टाकीवर पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या भागात नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
