गायीच्या गोठ्यात विजेचा प्रवाह उतरून एका जर्सी गाईसह दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू …..
पंढरपूर :- सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह उतरला आणि यामुळे एका गाईसह कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे घडली आहे.
या मध्ये रशिका विठ्ठल रेडे (वय 57) आणि सुवर्णा अमोल रेडे (वय 27) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळी सहाच्या सुमारास रशिका रेडे यांनी नेहमीप्रमाणे गाईच्या गोठ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. गोठ्यात गेल्यानंतर गाईला शॉक लागून ती खाली पडलेली दिसली. गाईला उठवण्याचा प्रयत्न करत असताना रशिकाबाईंना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळात सुवर्णा रेडे या गोठ्यात गेल्या असता त्या नाही या विजेचा झटका बसून त्यांचा मृत्यू झाला.
मात्र त्याही विजेच्या संपर्कात आल्या आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोठ्याच्या पत्राशेडमध्ये पाणी साचून, तिथे शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास अकलूज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी दीपक भोसले करत असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे.
