

पंढरपूर :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. पंढरपूर मध्ये मात्र चक्क मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओबीसी नेते दिलीप धोत्रे यांचे आभार मानणारे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत.

संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, छावा संघटनेचे सागर चव्हाण, तानाजी मोरे, सुरज पेंडाल यांच्यासह अनेक मराठा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
मराठा आरक्षणावरून ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटलेला असतानाच पंढरपूर मध्ये मात्र वेगळं चित्र दिसत आहे. मराठा समाजाच्या वतीने सोशल मीडियावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओबीसी नेते दिलीप धोत्रे यांचे आभार मानले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओबीसी नेते दिलीप धोत्रे यांनी मराठा आंदोलकांना मुंबईला जाण्यासाठी गाड्या आणि डिझेलची सोय केली. त्याचप्रमाणे दिलीप धोत्रे यांनी आपल्या मुंबईतील घरामध्ये त्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय केली. त्यामुळे सोशल मीडियावर मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांच्या वतीने मनसेचे ओबीसी नेते दिलीप धोत्रे यांच्या आभाराच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. एका बाजूला मराठा आरक्षणावरून मराठा नेते आणि ओबीसी नेते यांच्यामध्ये वैचारिक संघर्ष सुरू असताना पंढरपूर मध्ये मात्र मराठा समाजाच्या वतीने ओबीसी नेते दिलीप धोत्रे यांचे सोशल मीडियावर आभार व्यक्त केली जात आहे.
एका बाजूला मराठा विरुद्ध ओबीसी असा टोकाचा संघर्ष वाढत असताना पंढरपूर मध्ये मात्र सर्वधर्मसमभावाचे आश्वासक चित्र दिसत आहे.
