पुणे विमानतळावरील तपासणीत सापडली बंदूक
बागल हे कॉटेक्टर व माजी जिल्हा परिषद सदस्य
पंढरपूर :- पंढरपुरातील कॉन्ट्रॅक्टर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सी पी बागल यांच्या बॅगेत बंदुकीसह पाच काडतुसे पुणे विमानतळावर सापडले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. बागल हे पुण्याहून वाराणसीला विमानाने निघाले होते. यापूर्वी पुणे विमानतळावर झालेल्या तपासणीत त्यांच्या बॅगेत बंदुकी सह पाच जिवंत काडतुसे आढळली आहेत. त्यामुळे बागल हे बंदूक घेऊन वाराणसीला का निघाले ? असा प्रश्न आता चर्चेला आहे. बागल यांच्याकडे शस्त्राचा परवाना आहे. मात्र हा परवाना महाराष्ट्र राज्यपुरता मर्यादित आहे. असे असताना विमानाने बंदूक घेऊन जाण्याची वेळ बागल यांच्यावर का आली ? अशी चर्चा होत आहे. या प्रकरणात सी पी बागल यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तर या प्रकरणात बागल यांच्याशी कुठलाच संपर्क होऊ शकला नाही.
कोण आहेत सी पी बागल…?
सी पी तथा चंद्रकांत बागल हे पंढरपूरच्या गादेगांव येथील मूळचे असून ते सध्या पंढरपुरात वास्तव्यास आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेत सदस्य म्हणूनत्यांनी काम पाहिले. तर 2014 साली राष्ट्रवादी पक्षाकडून बागल यांनी पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली होती. पुढे बागल यांनी भाजपात प्रवेश केला होता. या तर मात्र हल्ली सी पी बागल हे राजकीय पक्षापासून अलिप्त आहेत. पंढरपूरच्या ग्रामीण भागातील काही भागात एकेकाळी बागल यांचा चांगला दबदबा होत.
