पंढरपूर :- पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर पोलिसांनी शहरातील डोंबे गल्ली येथे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे. यामध्ये रोहित उर्फ लाला पानकर यांच्या सोबत इतर 13 जण जुगार खेळताना आढळून आले. या 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
पंढरपूर शहरातील डोंबे गल्लीमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवरात्रीच्या पूर्वसंध्येलाच जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. सदरचा जुगार अड्डा हा लाला पानकर यांच्या घराच्या जवळ आहे.
यावेळी पोलिसांनी तब्बल 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाई दरम्यान स्वप्निल टमटम, विकास गायकवाड ,किरण धोत्रे, हर्षवर्धन तडसरे, नितीन धोत्रे , राहुल काळुंखे, राजाभाऊ मिस्त्री, बाबू मांडवे, रोहित उर्फ लाला पानकर आणि लक्ष्मी पानकर यांच्यासह इतर 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे मात्र पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये कौतुक होताना दिसत आहे.
