पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकरांना टोला
पंढरपूर :- प्रेम करायचं एक वय असतं परंतु त्यांना आता उतारवयात प्रेम सुचलय. प्रेम करायचं वय आता निघून गेलं आहे. तुमच्या जीवनीत लोकांना त्रास दिला, त्यांची घरं दार उध्दवस्त केली. आता उतरावयात प्रेम आठवलाय लागलय असा टोला ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांना टोला लगावला.निंबाळकर गोरे आणि मंत्री गोरे यांच्या मनोमिनाला सध्यातरी ब्रेक लागला आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मंत्री जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये राजकीय वैर आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंत्री गोरे व माजी खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांच्या विरोधात जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी मनोमिलनाची भाषा सुरू केली आहे. त्यावर आज मंत्री जयकुमार गोरे यांनी मनोमिलनाची आता वेळ निघून गेल्याच स्पष्ट करत त्यांची खिल्ली उडविली. सध्यातरी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील एकीकरणाची आशा मावळली आहे.
