पंढरपूर :- पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आणि प्रभागाचे आरक्षण जाहीर झाले आहे. जनतेतून नगराध्यक्ष आणि अठरा प्रभागातून 36 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी आता पंढरपुरातील परिचारक विरोधी गटाने कंबर कसली आहे. आज माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे, पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत थोडे मान अपमान नाट्य रंगले. मात्र सरते शेवटी आमदार अभिजीत पाटील मनसे नेते दिलीप धोत्रे आणि नागेश भोसले यांनी प्रत्येक इच्छुक उमेदवारांचे मत जाणून घेतले.

यावेळी बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले, मी घरी बसणे पसंत करीन मात्र विरोधकांशी युती केव्हा आघाडी करणार नाही. आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये पंढरपूर नगरपालिकेवर सत्ता आणायची आहे. त्यामुळे सर्व मतभेद विसरून मी समविचारी नेत्यांबरोबर एकत्र येत निवडणूक लढण्यास तयार आहे. मी निवडणुकीसाठी परिचारक गटाच्या विरोधात फाटी ओढली आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी यावेळी भगीरथ भालके यांच्यासोबत देखील आपण चर्चेला तयार आहोत. मला कधीही कुठेही बोलवा. माझी तयारी आहे. त्यामुळे सर्वांनी एक दिलाने काम करावे.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी यांनी देखील परिचारक विरोधी आघाडीमध्येच एकत्र राहून लढणार असल्याचे घोषित केले. सर्व परिचारक विरोधकांना एकत्र करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. एकास एक उमेदवार देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी दिलीप धोत्रे यांनी केले.
यावेळी सुधीर धोत्रे, सुधीर आबा भोसले, आदित्य फत्तेपूरकर, श्याम गोगाव, संतोष कवडे, नागेश गंगेकर,संजय बंदपट्टे, सुभाष दादा भोसले, किरण राज घाडगे , प्रशांत शिंदे, विशाल अर्वे, चेअरमन संतोष सर्वगोड, शिवाजी मस्के, यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
भालके गटाचे अनेक इच्छुक उमेदवार देखील बैठकीला हजर राहिल्याने विठ्ठल परिवार पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
