पंढरपूर :- पंढरपूर शहरांमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेले एका महिलेचा चुकीचे रक्त दिल्याने मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील आढीव गावातील महिला प्रसूतीसाठी पंढरपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. सदर महिलेला मुल झाल्या नंतर रक्त देणे गरजेचे होते. यासाठी रुग्णालयाने जुना कराना का येथील स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरशी संपर्क साधला. मात्र या स्टोरेज सेंटरच्या माध्यमातून चुकीचे रक्त दिले गेल्याने महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. सदर महिलेचा रक्तगट हा बॉम्बे निगेटिव्ह होता. तिला ओ पॉझिटिव रक्तगटाचे रक्त दिले. रक्तपुरवठा केल्यानंतर महिलेची प्रकृती अत्यावस्थ झाली. सदर महिलेला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दोन दिवस शर्तीचे प्रयत्न केले मात्र महिलेचा जीव वाचला नाही. दैनिक सिंहासन टाइम्स ला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदस्य बातमी आम्ही प्रसिद्ध करत आहोत. B
नातेवाईकांची तक्रार असल्याने सदर महिलेचे शेव विच्छेदन हे पाच डॉक्टरच्या पॅनलच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती आहे.
स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरच्या अनेक तक्रारी.
डॉक्टर गजानन बागल चालवत असलेल्या स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज च्या बाबतीत अनेक तक्रारी असल्याची माहिती आता पुढे येत आहे. यापूर्वी देखील चुकीचा रक्तपुरवठा केल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे.
सदर रुग्णालयाने 200 बेडचे हॉस्पिटल दाखवून बेकायदेशीर रित्या शासनाची फसवणूक करून ब्लड बँकेचा परवाना घेतले असल्याचे देखील समजते.
