पंढरपूर :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, गणेश पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विठ्ठल परिवार दुभंगला होता. ऐन निवडणुकीच्या काळात भगीरथ भालके एकाकी पडल्याचे चित्र दिसत असताना असे नेते दिलीप धोत्रे यांनी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि भगीरथ भालके यांना एकत्र आणले. जिल्हा परिषदेच्या आठ आणि पंचायत समितीच्या 16 जागांची वाटणी केली. पहिली सभा वाखरी गटात घेऊन भाजप आणि कल्याणराव काळे यांना पहिला दणका देण्याचे काम मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मयुरी संतोष बागल यांच्या प्रचाराच्या बॅनरवरून चक्क दिलीप बापू धोत्रे यांचा फोटो गायब झाल्याने धोत्रे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचबरोबर भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत, नागेश काका भोसले यांचा देखील विसर पडल्याचे दिसत आहे.
मनसे नेते दिलीप धोत्रे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल परिवाराचा घटक म्हणून काम करतात. चेअरमन कल्याणराव काळे गणेश पाटील आणि युवराज दादा पाटील यांनी भालके यांची साथ सोडल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आमदार अभिजीत पाटील भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत, नगरसेवक नागेश भोसले यांची मोट बांधली. आणि भाजप समोर मोठे आव्हान उभे केले. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वाखरी , कासेगाव जिल्हा परिषद गटामध्ये योग्य तोडगा काढण्याचे काम मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले. मात्र आता तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना दिलीप बापू धोत्रे यांच्याबरोबरच भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत, नागेश काका भोसले यांचाच विसर पडल्याचे दिसत आहे.
दिलीप बापू धोत्रे , नागेश काका भोसले आणि अनिल दादा सावंत यांचे फोटो वगळल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. एका बाजूला भाजपने वाखरी गट जिंकण्यासाठी आपली ताकद पणाला लावलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला दिलीप धोत्रे आणि अनिल दादा सावंत यांचे फोटो वगळल्याचा फायदा भाजपाला होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
