पंढरपूर :- सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भगीरथ भालके यांना धोबीपछाड दिला आहे. भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली 12 पैकी 9 नगरसेवकांनी घेतली पालकमंत्री यांची भेट घेऊन महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी आमदार समाधान दादा अवताडे , माजी आमदार रामभाऊ सातपुते जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत, मनसे नेते दिलीप धोत्रे, प्रशांत गीड्डे, संतोष सुळे, श्याम गोगाव आदी उपस्थित होते.

पंढरपूर नगरपालिकेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 12 नगरसेवक आहेत. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भगीरथ भालकेंनी पालकमंत्र्यांना आव्हान दिले होते. तसेच 12 एप्रिल रोजी भगीरथ भालके आणि नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता ताई भालके यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यावेळी आयोजित मेळाव्यात भगीरथ भालके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले होते.
आज विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीची बैठक भैरवनाथ शुगरचे चेअरमन शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल दादा सावंत यांच्या निवासस्थानी आयोजित केली होती. या बैठकीला मात्र शिवसेना शिंदे गटाचे नेते भगीरथ भालके गैरहजर होते. त्यामुळे त्यांची विधानपरिषद निवडणुकीबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही.
दरम्यान सावंत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत 9 नगरसेवकांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुक निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भालके यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली 9 नगरसेवकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. या बैठकीस नगरसेवक नागेश काका भोसले, नगरसेवक प्रसाद भैय्या कळसे, नगरसेवक संजय बंदपट्टे, नगरसेवक लोकेश यादव, नगरसेवक अक्षय गंगेकर, नगरसेविका माधुरीताई धोत्रे, नगरसेविका रुक्मिणीताई धोत्रे, नगरसेविका साधना ताई धोत्रे, नगरसेविका प्रणिता ताई घाडगे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अपक्ष नगरसेवक ओंकार जोशी यांनी देखील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला आहे. त्यावेळी वाखरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रतिनिधींनी देखील पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली.
तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख हे सोबत सुद्धा पंढरपूर पंचायत समिती सभापती निवडीत भाजप सोबत होते त्यामुळे काय काय होत ते कळेल असे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले आहेत.
त्यामुळे मतदान होई पर्यंत पालकमंत्री जयकुमार गोरे अजून किती धक्के देतात हे पाहावे लागेल.
पंढरपूर हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूरच्या विकासासाठी आम्ही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. अशी प्रतिक्रिया तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गटनेते नागेश भोसले यांनी दिली.
