पंढरपूर :- शेतातील पाण्याची मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकरी दांपत्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना घडली आहे.
पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात रात्री मुसळधार पाऊस झाल्याने सकाळी लाईट आल्यावर मोटर बंद करण्यासाठी लक्ष्मण बाबू नागणे ( वय 60 ) आणि त्यांच्या पत्नी अलका नागणे ( वय 55 ) या मोटर बंद करण्यासाठी गेले असता विजेचा करंट लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शेतकरी दांपत्याच्या मृत्यूने आंबे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत देण्याची मागणी आता केली जात आहे.
