पंढरपुरातून गेलेल्या शिष्टमंडळात बाधित नसलेले व्यक्ती
संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर महाराजांनाही बैठकीत स्थान नाही…
तुकाराम महाराजांचे वंशज देहुकर महाराजांचे राहते घर कॉरिडॉरमध्ये बाधित…
मुख्यमंत्री आणि कॉरिडॉर बाधित शिष्टमंडळ यांच्या बैठकीत मोठा गोलमाल
700 मालमत्तांचे कॉरिडॉर मध्ये भूसंपादन होत असल्याने बाधितांना चर्चेचे आमंत्रण : मात्र प्रत्यक्ष बाधित नसलेले व्यक्ती बैठकीला…
शिष्टमंडळाने प्रशासनाचे देखील केली दिशाभूल….
पंढरपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात बैठक झाली. पंढरपूर कॉरिडॉरला विरोध असल्याने मुख्यमंत्र्यांनी मालमत्ता बाधित नागरिकांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी बोलावले होते. मात्र या 7 लोकांच्या शिष्टमंडळात 3 ते 4 मालमत्ता बाधित नसलेल्या लोकांनी हजेरी लावल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अवघ्या 2 ते 3 बाधितांना घेऊन शिष्टमंडळाने फुशारकी मारल्याने खऱ्या बाधितांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच या शिष्टमंडळाने प्रशासनाची देखील दिशाभूल केल्याचे बोलले जात आहे. पंढरपुरातील तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीला मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडून चर्चा करण्यासाठी बोलावले होते. मात्र यामध्ये मालमत्ता बाधित नसलेल्या लोकांचा समावेश मुंबईतील मुख्यमंत्री यांच्या चर्चेत असल्याचे पुढे आले आहे. महत्वाचे म्हणजे बांधितांच्या शिष्टमंडळात पंढरपुरातील तीन प्रत्यक्ष नावावर मालमत्ता नसलेले आणि एक परगावचे व्यक्ती असल्याचा समावेश आहे. त्यामुळे पंढरपूर कॉरिडॉरच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेमध्येच शिष्टमंडळाचा गोलमाल झाल्याची चर्चा आता पंढरपुरात सुरू झाली आहे.
