पंढरपूर :- मंडप ठेकेदारास दर्शन मंडपाचे काम देतो म्हणून 4 लाख 70 हजार रुपये घेतल्याचे आरोप श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांच्यावर झाले होते. त्यानंतर या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी मंदिर समितीच्या सदस्या ऍड माधवीताई निगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने दिलेला अहवाल 13 ऑगस्ट च्या बैठकीमध्ये स्वीकारण्यात आला. या अहवालानुसार मनोज क्षोत्री यांना व्यवस्थापक पदावरून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शासनाने मंदिर समितीला नवीन व्यवस्थापक द्यावेत अशी मागणी करण्यात आली. समितीचे माजी व्यवस्थापक मनोज क्षोत्री ज्यांच्यावर झालेल्या या कारवाईनंतर त्यांची सोशल मीडियावर पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.

पैसे घेतल्याचा आरोप झाल्यापासून मनोज क्षोत्री हे सक्तीच्या रजेवर होते. तसेच ते सोशल मीडिया पासून देखील चार हात दूर होते. मात्र कारवाई नंतर ते सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. त्यांच्या समर्थणार्थ देखील सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. मंदिर समितीच्या सदस्यांना आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे काम व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांनी केले होते. मनोज क्षोत्री यांच्या कठोर शिस्तीमुळे काही कर्मचारी आणि सदस्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केल्याचे सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. 
आता मनोज क्षोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. काय आहे ती पोस्ट पाहुयात ….
“समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला. आपलं कोण नसतं हे आपल्या नीच शिकवलं. लोक थोडी लेट कळाली पण परफेक्ट कळाली”
या आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. यातून काही जवळच्याच लोकांनी त्यांना धोका दिल्याचे संकेत त्यांनी दिल्याचे बोलले जात आहे. ती माणसं कोण होती ज्यांना समजायला मनोज क्षोत्री यांना उशीर झाला याची चर्चा आता सुरू झाली आहे.
