पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील एका तथाकथित कामगार नेता किरण पुरुषोत्तम घोडके याला 10 लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यातील 10 लाख रुपयांचा पहिला हफ्ता घेताना किरण घोडके याला पंढरपूर कॉलेज चौकातील एका हॉटेल मध्ये पकडले. पंढरपूर शहर पोलिसांनी किरण घोडके याला ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

