पंढरपूर :- पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. यंदा भाजपाने चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिचारक गटाच्या सौ.वैशाली सुनील वाळूजकर यांना भाजपची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपा कडून सौ. शामल शिरसट, सौ. स्मिता आधटराव यांनी उमेदवारी साठी मागणी केली होती. मात्र सौ. वैशाली वाळूजकर यांनी उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली असल्याचे समजते. आज उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता.

