कुर्डू ग्रामस्थांचा आरोप ….
पंढरपूर :- सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या माढा तालुक्यातील कुर्डू येथील अवैध मुरूम उपसा प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. वाळू व्यवसायाच्या स्पर्धेतून टेंभुर्णी विभागाचे सर्कल सुजित शेळवणे यांनी आयपीएस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांना चुकीची माहिती दिली. त्यातून हा प्रकार घडला आहे. सर्कल सुजित शेळवणे यांचे वाळू वाहतुकीला चार टिप्पर चालतात असा गंभीर आरोप कुर्डुचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी केला आहे. माजी सरपंचाच्या या आरोपामुळे महसूल महसूल विभाग चर्चेत आला आहे.
कुर्डू येथील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील मोबाईल संभाषण व्हायरल झाल्यानंतर अजित पवार अडचणीत आले आहेत. त्यानंतर महसूल विभागाने सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल केला आहे. कारवाईच्या निषेधार्थ आज कुर्डू ग्रामस्थानी गाव बंद ठेवून आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान येथील माजी सरपंच आण्णा ढोणे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा हिरो सर्कल सुजित शेळवणे हा आहे. त्यांचे अवैध वाळू वाहतूकीसाठी चार टिप्पर चालतात. याच धंद्याच्या स्पर्धेतून त्यांनी आपल्या मोबाईल वरून आयपीएस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांना चुकीची माहिती देवून कारवाई करण्यास भाग पाडले आहे. या प्रकरणी सर्कल सुजित शेळवणे यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
