बोगस खत तयार करणारा कारखाना मोठ्या नेत्याची असल्याची चर्चा.
पंढरपूर :- पंढरपुरात बनावट रासायनिक खत तयार करून त्याची शेतकऱ्यांनी विक्री करणारे मोठं रॅकेट समोर आले आहे. पंढरपूर जवळच्या कासेगाव येथे रासायनिक खत तयार करणाऱ्या एका कारखान्यावर कृषी विभाग आणि पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. कारवाई दरम्यान 11 लाख 12 हजार रूपये किंमतीचा 700 पोती खतांचा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील सुदीप सुरेश साळुंखे व अहिल्यानगर जिल्ह्यातील हंडी निमगाव येथील योगेश बाळकृष्ण जाधव यांच्यासह पंढरपूर जवळच्या विठ्ठल खत कारखाना यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासेगाव परिसरातील विठ्ठल खत कारखान्यात महालक्ष्मी फर्टीलायझर एल एल पी कंपनीने बनावट खत तयार करून ते शेतकय्रांना विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाला लागली होती. त्यानुसार गुण नियंत्रण अधिकारी व पोलिसांनी व पोलिसांनी विठ्ठल खत काखान्यावर छापा टाकला असता तेथे बनावट व बोगस खत तयार करून त्याची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. कारवाई दरम्यान विविध कंपन्यांच्या नावाने तयार केलेले 700 पोती बनावट खत आढळून आले. पोलिसांनी आरोपी विरोधात रासायनिक खत आदेश 1985 मधील खंड चे उल्लंघन केले व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 2,3,7 चे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
