भोसले, कंडरे कुटुंबा विरुद्ध वाळूसाठा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
महसूल विभागाची कारवाई ; १२ ब्रास वाळूसाठा जप्त
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना दणका.
पंढरपूर :- शहरातील भीमा नदीपात्रातून स्वतःच्या आर्थिक फायदा करिता ५६ हजार रुपयांचा अवैध वाळूसाठा करून ठेवल्या प्रकरणी पंढरपुरातील माजी उपनगराध्यक्ष अरुण कंडरे, माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले यांच्यासह भोसले व कंडरे कुटुंबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई बुधवारी सायंकाळी साडेचार ते आठच्या सुमारास करण्यात आली आहे. यामध्ये अरुण कंडरे यांचे बंधू प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजित कंडरे यांचा देखील समावेश आहे. नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना हा दणका मानला जातोय. महसूल प्रशासनाच्या या कारवाईने वाळू चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरातील भीमा नदी पात्रालगत असलेल्या २२७/१, ११३/४ या सर्व्हे नंबरच्या जमिनीमध्ये हेमंत वसंतराव भोसले, माजी नगराध्यक्ष सुभाष वसंतराव भोसले, मुकुंद वसंतराव भोसले, दीपक वसंतराव भोसले, श्रीनिवास मोहन यलमार (कंडरे), जालिंदर मोहन यलमार (कंडरे), दिलीप प्रल्हाद यलमार (कंडरे), माजी उपनगराध्यक्ष अरुण प्रल्हाद यलमार (कंडरे), प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजित प्रल्हाद यलमार (कंडरे) ( रा. सर्व पंढरपूर) यांनी शासनाच्या संमतीचे विनापरवाना वाळू साठा करून ठेवला होता. या कारवाईत ३२ हजार रुपये त्यात एकूण ८ ब्रास वाळू, २४ हजार रुपये त्यात एकूण ४ ब्रास वाळू असे ५६ हजार रुपयांचा वाळू साठा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाटी अमर पाटील, सहाय्यक तलाटी महेश कुमार मारुती सावंत, गणेश पिसे यांच्यासह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सरकारतर्फे महसूल अधिकारी महेश कुमार मारुती सावंत यांनी बी एन एस कलम ३०५ (इ), ३ (५), सह गाऊन खालीच कायदा कलम ४(१), ४ (क) (१), २१ पर्यावरण रक्षण अधि.का. १९८६ चे कलम १५ प्रमाणे कायदेशीर तक्रार दिली आहेत. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करत आहेत.
