विठ्ठल परिवार आणि परिचारक विरोधी गट एकत्र येण्याच्या मार्गावर….
परिचारक गटाला धक्का….
पंढरपूर :- सध्या राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये देखील नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी इच्छुक उमेदवारांकडून सुरू झाली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी जनतेतून नगराध्यक्ष पद हे राखीव झाले आहे. परिचारक विरोधी आघाडी कडून सध्या युवक नेते भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके, पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरीताई धोत्रे या सध्यातरी इच्छुक आहेत. मात्र उमेदवारी कोणाला द्यायची यावरून या परिचारक विरोधी आघाडीच्या नेत्यांमध्ये काही मतभेद होते. विठ्ठल परिवार म्हणून सर्व नेत्यांच्या अनेक वेळा बैठका झाल्या. मात्र यामधून काहीच मार्ग निघाला नाही. त्यामुळे अगोदर मतभेद दूर करू आणि नंतर उमेदवारीवर चर्चा करू अशी भूमिका सर्व नेत्यांनी घेतली. याला मुहूर्त लागला तो म्हणजे मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे सुपुत्र युवा उद्योजक श्रीयश धोत्रे यांच्या जन्मदिवसाचे.
युवक नेते भगीरथ भालके आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके यांनी जोडीने येऊन मनसेनेचे दिलीप धोत्रे यांचे सुपुत्र श्रीयश यांचा जन्मदिन साजरा केला. यावेळी पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले देखील उपस्थित होते.
श्रीयश धोत्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर धोत्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर या तीन नेत्यांमध्ये चर्चे अंती मनोमिलन झाले.
विठ्ठल परिवारातील आणि परिचारक विरोधी गटातील सर्व नेत्यांना एकत्र करून एकास एक उमेदवार नगराध्यक्ष पदाला आणि 36 वार्ड मध्ये देण्यावर देखील चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक तिरंगी होणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असल्याचे दिसत आहे.
सर्व मतभेद विसरून विठ्ठल परिवाराची एकत्र येण्याकडे वाटचाल सुरू असल्याने परिचारक गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.
लवकरच विठ्ठल परिवार आणि परिचारक विरोधी आघाडीची व्यापक बैठक घेऊन आगामी नगरपालिका निवडणुकीची रणनीती आखली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
