पंढरपूर :- शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर सोलापूर मधील 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. हेच लोन आता पंढरपूरमध्ये पोहचले आहे. प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक संजय बंदपट्टे आणि जिल्हा उपप्रमुख महावीर देशमुख यांनी आपल्या समर्थकांसह पक्षाचा राजीनामा दिला आहे.
प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्ह्यामध्ये व्यवस्थित काम सुरू आहे. मात्र काही चुकीच्या लोकांनी चुकीची माहिती पक्षातील वरिष्ठांना देत आहेत. तसेच प्राध्यापक शिवाजी सावंत यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत. पक्षातील गटबाजीचा आम्हाला देखील त्रास होत असल्याने आम्ही राजीनामा देत असल्याचे राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.
संजय बंदपट्टे आणि महावीर देशमुख यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सदरचे राजीनामा पत्र थेट उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले आहे.
